Avinash

Avinash

  • Submitted By: avinashk
  • Date Submitted: 07/27/2010 6:29 AM
  • Category: English
  • Words: 4766
  • Page: 20
  • Views: 234

• अंगात नाही बळ आणि चिमटा घे‌उन पळ.
• अंगापेक्षा बोंगा जास्ती.
• अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
• अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
• अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
• अंथरूण पाहून पाय पसरावेत.
• अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
• अंधारात केले पण उजेडात आले.
• अंधेर नगरी चौपट राजा.
• अकिती आणि सणाची निचिती.
• अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
• अक्कल खाती जमा.
• अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
• अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
• अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
• अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
• अघळ पघळ अन घाल गोंधळ.
• अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
• अडला हरी गाढवाचे पाय धरी.
• अडली गाय खाते काय.
• अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
• अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
• अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
• अढीच्या दिढी सावकाराची सढी.
• अती केला अनं मसनात गेला.
• अती झालं अऩ हसू आलं.
• अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
• अती तिथं माती.
• अती परीचयात आवज्ञा.
• अती राग भीक माग.
• अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
• अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
• अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
• अपयश हे मरणाहून वोखटे.
• अपापाचा माल गपापा.
• अपुऱ्या घड्याला डबडब फार.
• अप्पा मारी गप्पा.
• अर्धी कोंबडी कापून खायला, अर्धी अंडी घालायला.
• अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
• अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
• अल्प बुध्दी, बहु गर्वी.
• अल्प मनुष्य कोपे, लहान भांडे लवकर तापे.
• अळवाची खाज़ अळवाला ठा‌ऊक.
• अळी मिळी गुपचिळी.
• अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव‌ई डॉक्टर.
• अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
• असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
• असतील चाळ तर फिटतील काळ.
• असतील मुली तर पेटतील चुली.
• असतील शिते तर जमतील भूते.
• असून अडचण नसून खोळांबा.
• असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
• असेल दाम तर हो‌ईल काम.
• असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
• असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी.
• आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
• आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
• आंधळीपेक्षा तिरळी बरी.
• आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू...